Saturday, September 16, 2023

 




प्रभाकर बाळकृष्ण श्रीखंडे ' प्रेम '

 (७ ऑगस्ट १८९७ -३ फेब्रुवरी१९८२)

           

देशाच्या स्वातंत्र्य युद्धात आपल्या लेखणीनं इंग्रजांना खुल्या आव्हानाने लढा देणाऱ्यांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे कवी प्रभाकर श्रीखंडे ' प्रेम '.कवी प्रभाकर यांचा जन्म ७ ऑगस्ट १८९७ साली उरई ,जिल्हा जालवण ,उत्तर प्रदेश येथील श्रीखंडे कुटुंबात झाला. प्रभाकर सहा वर्षाचे होईस्तोपर्यंत त्यांच्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतलेला होता. नंतर आजोबा श्री मुकुंदराव श्रीखंडे(रीवा या संस्थानातील दिवाण) यांनी त्यांचा सांभाळ केला. प्रभाकर यांनी १९१३ साली अजमेर शिक्षण बोर्ड येथून इंटरची परीक्षा पास केली. १९२५-२६ च्या दरम्यान त्यांनी विश्वभारती संस्थेकडून चित्रकलेत स्नातक ही उपाधी मिळवली. १९२९ पासून ते सतना येथील व्यंकटेश हायस्कूल मध्ये चित्रकलेचे शिक्षक म्हणून नेमले गेले. १९३०साली त्यांचा विवाह कमला भागवत यांच्यासोबत झाला. त्यांची तीन अपत्ये म्हणजे - श्री शरद ,श्री मधुकर आणि प्रमिला श्रीखंडे.प्रमिलाताई ,(डॉक्टर यादवराव खेर, माजी विभाग अध्यक्ष, रसायनशास्त्र विभाग, सागर विश्वविद्यालय सागर) यांच्या पत्नी होत्या.

प्रभाकर यांनी देशाचा पारतंत्र्यकाळ खूप जवळून बघितला किंबहुना अनुभवला होता तत्सम १९१७ पासून त्यांनी 'प्रेम’ या टोपण नावाने भारतात ब्रिटिशांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि शोषणाच्या विरुद्ध लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या ' राष्ट्रीय स्वतंत्रता संग्राम ' संग्रहातील कविता १९२० पासून समोर येऊ लागल्या होत्या. त्यांच्या कवितांतील स्पष्ट आव्हानांने चिडून ब्रिटिश शासनाने त्यांच्या काही कवितांवर त्याकाळात रोख रुपये एक हजार ,रुपये पाचशे असा दंड ही केला .या संग्रहातील कवितांमध्ये आपल्या राष्ट्राला ब्रिटिश हुकूमशाहीपासून मुक्त करविण्याची तळमळ स्पष्ट दिसते .
 साहित्य सर्जनाच्या दृष्टीनं 'प्रेम'हे हिन्दी कवितेतील 'द्विवेदी' युगाचे कवी होते . ते  बुंदेलखंड प्रांतातील कवी घासीराम व्यास,रामचरण मित्र हयारण ,ज्वाला प्रसाद ज्योतिषी यांचे समकालीन होते .खरंतर त्यांनी आपल्या कविता लिहिण्याची सुरुवात वयाच्या तेराव्या वर्षीच केली होती परंतु त्या कविता वाचकांसमोर आणण्यात त्यांना अतिशय संकोच होत होता. मग  मित्रांच्या प्रयत्नाने १९१७ पासून त्यांच्या कविता लोकांकरता फक्त उपलब्धच झाल्या नाही तर कालांतराने जन -मनात ,राजनैतिक चैतन्यतेच्या दृष्टीने देखील महत्त्वाच्या ठरल्या.राष्ट्रीय स्वतंत्रता संग्राम ' या काव्य संग्रहासाठी  १३ मे १९६६ ला शिंदे राजदंपती तर्फे, एका भव्यसमारंभात  त्यांचा सन्मान करण्यात आला.' प्रेम ' यांनी भारताचे पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य असे  दोन्ही काळ बघितले होते आणि दोन्ही काळातील देशाच्या मूळ प्रश्नांवर त्यांची बारीक अशी नजर होती. १९६३साली त्यांनी चीन -भारत युद्ध (१९६२) विषयावर ' सामरिक गान ' लिहून आपला आव्हानात्मक प्रतिसाद दिला होता.  ' प्रेम ' यांच्या पारतंत्र्यकाळावर केंद्रित कविता, हिन्दी-उर्दू मिश्रित भाषेत ,वीर रसाच्या असून त्या राष्ट्र गौरव, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय समस्या अशा विषयांवर प्रामुख्याने व्यक्त झाल्या आहेत.
निसर्ग सौंदर्य, कवी 'प्रेम' यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. वर्ष १९१० च्या जवळपास हिंदी कवितेत छायावादी काव्याच्या सावटात निसर्ग चित्रणाच्या कवितांची जणू बहारच आली होती. निसर्गात माणसांच्या क्रियांचा भास (छाया -सावली )दाखविणाऱ्या छायावादी कविता कवी ' प्रेम ' यांचा मनात अशा काही घर करून बसल्या की मग बराच काळ लोटल्यानंतर देखील  वर्ष १९६०ते१९७९ च्या अवधीत त्यांनी त्याच भावदशेच्या सुंदर कविता रचल्या आणि त्या 'प्रेम पुष्पांजली' आणि 'प्रेम भावांजली ' या अप्रकाशित काव्य संग्रहात जपून ठेवल्या .निसर्ग , कल्पनाआणि संवेदनांची अप्रतिम सांगड या कवितांना एक वेगळाच गहिरा रंग देते. हिंदी काव्य शास्त्रातील विविध अलंकार,गुण, रस, शब्द शक्ती या सगळ्यांचा त्यांच्या कवितेत अतिशय कौशल्याने उपयोग झाल्याने,त्या कविता सहजरित्या मनाला स्पर्श करतात . 

त्यांनी जितक्या जिव्हाळ्यांनी निसर्ग सौंदर्याच्या कविता रचल्या तितक्याच कळकळीनं सामाजिक पातळीच्या विषमतेबद्दलही स्पष्टपणे लिहिलं . त्यांच्या अशा कविता 'प्रेम पुष्पांजली' यात संग्रहित आहेत. या संग्रहात एकूण ८५ कविता असून त्या आपल्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या भागात विभागल्या गेल्या आहेत. यात पहिल्या टप्प्यावर कवीने आपल्या शब्दांनी निसर्ग सौंदर्य रेखाटलेलं आहे .दुसऱ्या टप्प्याच्या कविता वास्तविकतेच्या जमिनीला स्पर्श करीत लिहिल्या गेलेल्या यथार्थवादी कविता आहे.  अशा स्वरूपाच्या कविता सामाजिक विषमता, विटंबना, रूढीवादी संकीर्ण विचार, शोषण ,अत्याचार, अन्यायाच्या विरुद्ध आक्रोशाने व्यक्त होऊन, सामाजिक बदल घडविण्याच्या समर्थनात उभ्या दिसतात .तिसऱ्या टप्प्याच्या कविता भक्तीभावाने पूर्ण आहेत. यात कवी  स्वतःला ईश्वरास अर्पण करून त्याच्यात एकात्म होऊ पाहतोय . कवी मनातील आशा -निराशा यात गांभीर्याने व्यक्त झाली आहे.

या संग्रहातील कवितांची भाषा-शैली सरस आणि सोपी असून नादात्मक आणि  चमत्कृत करणारी आहे. गेयता या कवितांचा मुख्य गुणधर्म आहे. 

कवी प्रभाकर श्रीखंडे 'प्रेम'यांच्या रहस्य आणि यथार्थ भावांच्या कवितांचा अतिशय सुंदर संग्रह म्हणजे ' सौरभ '. या संग्रहातील कवितांमध्ये उत्सुकताआणि वास्तविकतेचा सळमिसळ भाव पसरलेला आहे. या संग्रहाविषयी कवी प्रेम यांनी लिहिले की-"वेदना और हर्ष के मिश्रित उल्लास को एक छोटे से मधु -पात्र में रखकर, मैंने प्रेमी मधुकरों को मधु प्राशनार्थ मधुशाला में रखा है। इससे प्रकृति, प्रेम ,सौंदर्य और भाव पीयूष की बूंदे छलकती हैं।" सौरभ हे एकूण ४० कवितांचं संकलन आहे . जगण्याबद्दल अनासक्ती भाव आणि अलौकिकाच्या विषयी आसक्तीचा भाव या कवितांचा उर्वरित विषय आहे. 
अष्टपैलू व्यक्तिमत्व कवी प्रभाकर श्रीखंडे ' प्रेम ' साहित्यात वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहेत . याच उपक्रमात 'श्रीखंडे सहस्त्रावली' हे त्यांच्या विविध प्रयोगाचं एक आणखी उत्कृष्ट असं उदाहरण म्हणता येईल.हिन्दी कवितेची रितीवादी शैलीची परंपरा अनुसरून 'प्रेम ' यांनी एक हजार दोहे रचले . या दोहावलीत शृंगार ,भक्ती, नीती, उपदेश, ज्ञान आणि वैराग्याचे सुंदर दोहे आहेत. हे दोहे समकालीन समाजाचे यथार्थ रूप देखील वाचकांसमोर ठेवतात. डॉ रामकुमार वर्मा,पंडित देवलाल शर्मा, डॉक्टर रघुवीर सिंह , पंडित गया प्रसाद शुक्ल ' सनेही'आणि इतर अनेक गाजलेल्या हिन्दी साहित्यिकांनी श्रीखंडे सहस्त्रावलीचं  भरभरून कौतुक केलं आहे.

'भारतीय दर्शन' वेदांताच्या व्यापक विचारांवर आधारित आहे. प्रभाकर श्रीखंडे '‌प्रेम ' यांच्या कवितांमध्ये देखील ठिकठिकाणी भारतीय दर्शनाचा भास होतो. त्यांच्या कवितेत  वेदांतातील शैव आणि वैष्णव दोन्ही  मतांचं समन्वय दृष्टीस पडतं. एका दृष्टीने त्यांच्या कविता " सर्वे भवंतु सुखिनः " ची  अपेक्षा बाळगणाऱ्या कविता आहेत.

 कवी प्रभाकर श्रीखंडे ' प्रेम ' यांची कल्पनाशक्ती अप्रतिम होती.विषय कुठलाही असो, विषयाच्या खोलावर जाऊन त्याचं सत्य शोधून आणि त्याला योग्य ती शब्दकल्पनांची सांगड घालून व्यक्त करणं, हे यांच्या साहित्याचं आगळ -वेगळं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कवितेत तत्सम , तद्भव , देशज, विदेशी, बोलीभाषांचे प्रयोग सहजतेने झालेले आढळतात.' प्रेम ' यांनी मोठ्या प्रमाणात आपलं लिखाण हिन्दीतच केलं आहे. त्याशिवाय त्यांचं काहीसं साहित्य उर्दू ,इंग्रजी आणि मराठीत आहे परंतु त्यात कवितांचे विषय हिन्दीतीलच आहेत.एकूण निसर्ग ,राष्ट्र  ,समाज आणि माणसांना प्रेम करणाऱ्या प्रभाकर श्रीखंडे ' प्रेम 'यांनी आपल्या कवितांच्या मार्फत वाचकांना शब्द -भाव रूपात विचार आणि दृष्टीचा मोलाचा ठेवा दिलेला आहे . 

अशा अतिशय प्रतिभावान कवी प्रभाकर बालकृष्ण श्रीखंडे ' प्रेम ' यांनी ३ फेब्रुवरी १९८२ ला या जगाचा निरोप घेतला. 

१.जुल्म हो रहा है 

क्यों जुल्म इतना हम पर सरकार हो रहा है?

हम न्याय चाहते हैं , इन्कार हो रहा है।।

जलियान बाग वाली जब याद हैं दिलाते

दिल दर्द से धड़क कर ,बेजार हो रहा है।।


पा करके हमको दब्बू, सब लोग हैं सताते

फर्जी तुम्हारा देखो ,शहदार हो रहा है।।

बर्बाद कर रहे हैं, वो आशियाॅं हमारा

उनका वतन शुरू से, गुलजार हो रहा है।।


हम थे स्वतंत्र घर में ,गुजरा है वह जमाना

जो था कभी फिरंगी , सरदार हो रहा है।।

कर दो रिहा कहा तब ,मुद्दत कफस में गुजरी 

ठहरो जरा अभी तो, इजहार हो रहा है।।


दम घुट रहा है लेकिन, कुछ साॅंसे चल रही हैं

खंजर दिखाकर कहते, उपचार हो रहा है।।

दुर्भिक्ष यह पड़ा है ,महॅंगी रुला रही है

तब प्रिंस का भला क्यों ,सत्कार हो रहा है?


भेजे हैं जेल नेता , बागी सभी बताकर

गफलत में था जो हिंदू  होशियार हो रहा है।।

हस्ती हमारी मेटो, राजी हैं हम उसी में

अब ' लौ ' यही तुम्हारा ,दरकार हो रहा है।।

('अवधवासी '  लखनऊ या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या या कवितेवर त्यांना पाचशे रुपयांचाअर्थ दंड भरावा लागला होता )


 २. मक्कार मूजियों का यह घर नहीं भारत

भारत है घर हमारा ,औरों का घर नहीं है

मक्कार मूजियों का, हरगिज ये घर नहीं है।।

हम जिस्मों-जाॅं है उसकी ,वह जान है हमारी 

कट जाए धड़ से जो सिर  ,ये सिर वो सिर नहीं है।। 


कातिल ने तेंग खींची, या जान की है बाजी 

सर पर बॅंधा कफन है ,मुतलक फिकर नहीं है।। 

आते हैं इम्तहाॅं को ,अब यार शेर दिल के 

डरपोक बुजदिलों को, इस जाॅं गुजर नहीं है।। 


सीना खुला है अपना, खंजर को भोंक दें वो

आतें भी चीर दें वो ,लब पे जिकर नहीं है।।

भरम दिला रहे हैं, बदलेगा रंग जमाना 

उनको किए सितम की, कुछ भी खबर नहीं है।।

('महारथी ' मासिक दिल्ली ,येथून १९२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कवितेवर एक हजार रुपयांचा अर्थ दंड लागला होता)[05/09, 07:10] अर्चना शेवडे: स्वतंत्रेच्या संग्रामात शस्त्रास्त्र न उचल


 ३. तारागण 


खरादा कभी गया था चाॅंद

तभी से आई है यह चमक।

छटे हैं उड्डगण छोटे -बड़े 

निराली उनकी भी है दमक।।


 सदा से रहते होंगे साथ

 नया होगा वियोग का रोग।

 रो पड़े होंगे प्रेमी -ह्रदय

 हुआ होगा जब कठिन वियोग।।


 बढी़ थी प्रेम -चंग की डोर 

 गई थी फिर वह कर से छूट।

 हुआ होगा वह ह्रदय विदग्ध

 गया होगा फिर तड़ से टूट।।


बाल -रवि को निज डलिया मान

उषा सुंदर साड़ी पहने।

 चली है नभोद्यान की ओर

 कुसुम चुनकर गूॅंथे गहने।।


कल्पना खग को चुराने की

न कोई माने या माने।

कहूॅंगा मैं तो  किंतु अवश्य

प्रकृति ने छिटकाए दाने ।।


४. आज विधान बदलना होगा


अपने स्वेद  बिंदु से सींचा ,जिसने सूखे मैदानों को।

वह जग पालक तरस रहा है ,स्वयं धान के दानों को ।।

लाखों पेट भरे हैं जिसने,अपना दुबला पेट काटकर।

वही विश्व का जीवन दाता ,स्वयं जी रहा धूल चाट कर।।

जो स्वामी का पेट ना पाले ,वह खलिहान बदलना होगा।।

आज विधान बदलना होगा।


वस्त्र बनाने को बाॅंधा था ,निज जीवन का ताना-बाना।

विश्व ढाॅंपने  हित दे डाला, अपना सारा नया -पुराना।।

जग की लाज बचाने वाला ,स्वयं नग्न रहता जीवन भर।

एक चीथड़ा मिले जिसे ,वह कैसे ओढ़े नीचे -ऊपर।।

निर्माता का अंग न  ढाॅंके,वह परिधान बदलना होगा।।

आज विधान बदलना होगा।

  

मैं रचना हूॅं उस सृष्टि की, जिस सृष्टि ने तुम्हें रचाया ।

उस मिट्टी के अंग हैं मेरे, जिस मिट्टी ने तुम्हें बनाया ।।

फिर मुझसे इतनी नफरत ,क्या मैं तुम सा इंसान नहीं हूॅं?

फिर तुममें- मुझमें अंतर क्यों ,मानवता की शान नहीं हूॅं?

भेदभाव जिसने उपजाए ,वह इंसान बदलना होगा।।

आज विधान बदलना होगा।।


५. रात भर मैंने मिलन के गीत गाए


मैं निशा में थी तुम्हारा पथ निरखती,

चाॅंद भी मुझसे बहुत ही दूर था प्रिय।

कह न पाई मैं हृदय की पीर चुभती,

क्योंकि मेरा प्यार भी मजबूर था प्रिय।

पूछ लेना प्राण तुम इन तारकों से,

कौन बैठा रात भर दीपक जलाए।।


पूछती है रजनीगंधा अब विहॅंसकर, 

कौन है वह मीत तुमको छल गया है? 

कौन है वह सीप में दृग की अचानक, 

एक मोती की तरह जो ढल गया है? 

पूछ लेना तुम निशा के हर प्रहर से, 

कौन बैठा रात भर पलकें बिछाए।।


रात भर बारात शलभों की शिखा पर,

प्रणय का उपहार लेकर जल गई प्रिय।

मिलन की मधु चाह मेरी भी मचलकर,

वेदना का ताप सहकर जल गई प्रिय।

पूछ लेना दीप की जलती शिखा से,

कौन बैठा रात भर लौ उर लगाए।।


बीन के यह तार उन्मादक थिरक कर,

रात भर आवाज देते रह गए प्रिय।

गीत के स्वर कंठ तक आए मगर फिर,

अश्रु बनकर लोचनों से बह गए प्रिय।

पूछ लेना तुम  विकल उस रागिनी से,

कौन जिसने रात भर हैं गीत गाए।।


रात भर मैंने मिलन के गीत गाए,

पर ना मन के मीत अब तक लौट पाए।।


 ६. श्रीखंडे सहस्रावली - विविध रस


संयोग -

कंत लखै बाल को , लखै कंत को बाल

प्रेम विभोरी भोरीसी ,खोय खड़ी सुध ख्याल।


वियोग -

प्रेमी बिरही आह भरी, चंचल दिन रैन

चाह चिता अंगार में ,जरि -मरि पावत चैन ।


करुण-

शलभ जला जब प्रेमवश ,हुआ दीप मुख म्लान 

ॳॅंसुवा ढारत जल रहा ,पल-पल वर्ष समान।


हास्य-

चढ़न चले थे ठाठ से ,दोनों टाॅंग पसार

 मुॅंह के बल औंधे गिरे,हॅंसे साथ के यार।

 

वीर-

प्रबल मर्द की खड्ग से, कट - कट गिरते मुंड

सम्मुख टिक सकता नहीं, डरपोकों का झुंड।


रौद्र -

सह जाता  चुपचाप जो, खाकर पद प्रहार

कायर ऐसे मनुज का ,जीवन है धिक्कार।


वीभत्स

सूरा क्षत्री वीर जैं ,लड़ें सचाई हेत

अंग -अंग कट छट गिरे, तऊ न छांड़े खेत।


शांत -

दुख सुख समता मानि के ,रहो प्रेम तल्लीन

आदि ,मध्य ,अवसान में, रहो सरस रस लीन।

.................

नायक भेद-

बिलमी बोलो कित रही ,कहाॅं बॅंटो चित ध्यान

लाली ओटन मे लसी ,कहाॅं रचायो पान ।


नायिका भेद-(मध्या )

रीझत, खीझत , लजति है , लजवंती सी नारी

पिया देखी झुक झुक परे ,चितवत घूॅंघट टारी।

..............

विविध भाषा बोली-

ब्रज-

बगरयो बीथिन बाग में , बेलिन  बेली बसंत

सरसों सी  पीयर भई, नारि बिना निज कंत ।


अवधी-

बरखा से ॳॅंसुवा ढरे , दीरघ स्वाॅंस गंभीर

कोयल कूक सुनाए क्यों, मारत हिय में तीर।


बुंदेली-

गुन न  हिरानो जगत से,  गुन गाहक  हीरान

गुनिया बिनु मुकतान की ,कौन करे पहिचान ।


भोजपुरी -

नैना जियरा खातु है ,निकसत कठिन मरोर

ॴॅंजन ॴॅंजे करति है ,कुटिल चोट चित चोर।


उर्दू-

जबरदस्त ज़ालिम संभल, होगा जल्द तबाह

जादू का रखती असर ,जिगर जले की आह।

....................

ज्ञान उपदेश भक्ति -


तीरथ व्रत राखे कहा ,कहा गंग जल पान

हिरदो  जाकर सुद्ध है, मानव वही महान।


जब लों तन में  साॅंसु है , कह ले मुख से राम 

यही नाम के उच्चरे, सुधरत सारे काम ।


  सगुन निगुन में भेद क्या , भेद रहित इक सार

  पंथ दोहुन को एक है, प्रेम ,प्रणय ,अभिसार ।

  

  तुम बिन मेरो कौन प्रभु, मैं  हूॅं दीन अनाथ

  बाधा जग की हरण करि, कीजे मोहि सनाथ।


७. चाॅंद किसकी रजत छाया


सोचता हूॅं शून्य क्या है, चाॅंद किसकी रजत छाया,

आज सूने पंथ पर यह ,दीप है किसने जलाया?


वेदना की रागिनी यह ,कौन मन में  गा उठा है,

ऑंसुओं  के आवरण मे, कौन आकर मुस्कुराया?


विश्व परिवर्तन भरा है ,कौन है ,किसका यहाॅं पर,

चल रही कब से न जाने, है न मंजिल का पता कुछ,

राह को मंजिल बनाने यह अनोखा कौन आया?


पी गया मैं तो हलाहल, ले किसी का नाम है प्यारा,

विश्व क्या है, रंगशाला और जीवन एक नाटक,

आज फिर किसने हटाकर, सत्य का दर्शन कराया?


८. ईश्वरत्व 


तू है जीवन विश्व प्रकाश।

गुल में, गिल में , 

जल में , थल में, 

तेरा है आभास।।


कल -कल स्वर में,

शुचि -भूधर में, 

नील शिखर के 

सुंदर घर में,

जुगनू के वर -प्रभाकुंज में ,

कौतुक हास विलास।।


अगणित तारे ,

तन-मन वारे,

प्रकृति सॅंवारे 

लगते प्यारे

सूर्य चंद्र में 

रूप तिहारा ,

करता मृदु -मृदु हास।।  


खग-कलरव में,

कीर्ति-विभव में,

वट -पल्लव में, 

उद्भव -भव में। 

सुषमा प्रेरित मन -मंदिर में ,

करता सृष्टि -विकास ।।


तू ही सृजन है ,

तू ही भजन है ,

प्रेम मिलन की 

तू ही लगन है 

दीन दुखी का 

त्राणनाथ तू ,

मौलिक सुलभ -सुपास।।

 तू है जीवन विश्व प्रकाश।।...........


९. भाई -भाई  


एक माॅं के पुत्र प्यारे ,गोद में पले हैं दोनों 

जाति ने क्यों मिट्टी ,इनकी बदल डाली है? 


ऊॅंचे की महत्ता ,छोटे बिन रहती है कब , 

सुदामा की दशा ,दानी कृष्ण ने सॅंभाली है । 


शबरी के बेर झूठे, खाके दिखला दी प्रीत, 

प्रेम की मिठास कुछ और ही निराली है। 


सत्य की कसौटी चाहो, गले से लगा कर कहो 

स्वागत करेंगे भाई ,चलो घर खाली है।  


छूत का अभूत भूत,भेद को नसाय भ्रात,  

ज्ञान को प्रकाश -आस भानु चमकाइए।  


अंग के अपंगु के, न ह्रास कीजे बंधुन को ,  

जनम के साथी -संगी बैर न बिसाइए।  


दान और दया के पात्र, पतित सुपात्र प्यारे ,  

देश धर्म नातेहु तो इन्हें अपनाइए।  


वर्ण को अछूत ,प्रजा देश को डुबोती नष्ट,  

जड़ से, समूल इसे काट के गिराना है।  


शक्ति को जुटाके ,छिन्न एकता के रज्जू बीच,  

पशुता का मद खंड -खंड हो दिखाना है।  


पतितों के, पावन के ,भारत में जान डाल,  

वैभव स्वतंत्रता का कर्मयुग लाना है।


१०. निर्झरिणी

ठुकरा किस निष्ठुर के उर से 

यह आह -लता द्रवमान हुई ?

किस निर्जन में शशि के 

कर -पाश से चंचल नन्ही सी जान हुई?


कब से तुम कानन हार बनीं ,

कब से हरियाली की शान हुई?

कर गान  रही किसकी छवि का,

कवि से कब से पहचान हुई?


कब वायु की मस्त ठिठोलियों से,

कुछ कंप हुआ तन में मन में?

कब उषा की स्वर्णिम -श्री विकसी,

सखी आपके उज्ज्वल आनन में?


कवि से न छिपो,  कह दो कितने दिन ,

खेल सकीं इस ऑंगन में?

प्रिय के उर से मिल के वो 

अनंत सुहाग मिला किस निर्जन में?


उस घोर तिमिस्त्र निशा में जहाॅं , 

मग शूल लतादिक घास घनी ।

सुन केहरि, व्याघ्र , श्रृॅगाल करी 

रव नीरव भीत  हुई रजनी?


कल नूपुर शब्द सुनाती हुई ,

अरु छोड़ती भाल प्रसून चली ।

करने को चली अभिसार कहाॅं ,

किससे अनुराग भरी सजनी ?


नभ से शुचि बैंगनी सारी सजी ,

वन देवी की‌ फूल किनारी भली।

शिर माॅंग में बाल दिवाकर से 

लाल सुहाग की श्री रच ली ।


पिघला हुआ निर्मम मानस है,

तुम ही कहो उर -भार है क्या?

वन मे शिर शूल शिला पथ से , 

टकराना ही सुस्थिर प्यार है क्या?


सजनी! सुलझा दो मेरी उलझी ,

यह पावन प्रेम की धार है क्या? 

कल गान सुना सुख से बहना , 

गल जाना ही जीवन सार है क्या ?

संकलन  : संध्या टिकेकर 



Tuesday, June 27, 2023











 
प्रफुल्लता जाधव

(२१ जानेवारी १९३०----)




देवास म्हणजे जिथे देवांचा वास ! या देवभूमीत असंख्य हिरे विखुरलेले आहे. पद्मविभूषण कुमार गंधर्व, उस्ताद रज्जब अली खाँ, भा. रा. तांबे, राजकवी गोविंद झोकरकर, कवी नईम, चित्रकार अफझल आणि इतर.. या सुवर्ण इतिहासामुळे देवासला "कला नगरी" पण म्हणतात.  याच कला नगरीतील एक माणिक्य डॉ. प्रफुल्लताताई जाधव.  कै. मेजर जनरल अनंतराव सडेकर पवार, बडोदे यांची कन्या. देवासचे प्रसिद्ध वकील कै. शरदचंद्र जाधव यांची पत्नी. राजघराण्यातील जन्म झाल्या मुळे तसेच भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि बडोदे येथे शिक्षण (दहावी पर्यंत) झाल्या मुळे साहित्याचा विराट वारसा. प्रफुल्लताताईंची कविता लिहिण्याची एक विशिष्ट शैली होती. विविध विषयांवर, बोलीभाषा वापरून पण त्यांनी काव्य रचले आहे. प्रफुल्लता ताई जाधव यांचे प्रकाशित साहित्य म्हणजे, चार कविता संग्रह 'गान गुणगुण' , 'मुक्तांगण', 'शब्दरंग' व  'मुक्तरंग', कथासंग्रह 'सत्यम् वदामि' यात सत्यकथांचा समावेश आहे. कादंबरी 'गोकुली'.याशिवाय 'वसंत' 'अनुराधा' या मासिकातून मुंबई येथून कथा प्रकाशित झाल्या आहेत. हिंदी साहित्यात पण 'कोविद्' ही उपाधी प्राप्त. काव्य, वाङ्मय, समीक्षा, संशोधन, इतिहास, चित्रकला इत्यादी त्यांचे छंद आहेत. आकाशवाणी इंदौर वर नियमितपणे काव्य गायन, नाट्यलेखन समीक्षा व व्याख्याने दिली. प्रफुल्लता ताई जाधव यांनी संत एकनाथांच्या एकंदर वाङ्मयांत व विशेषतः त्यांच्या अभंग, गवळणी, भारुडे, रूपके यासारख्या स्फुट रचनांत व्यक्त होणाऱ्या भक्तिभावाचे स्वरूप , यात ना. ग. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १९७८ मधे पीएच.डी. केली. 

 प्रफुल्लताताईंचा दृष्टिकोन व्यापक आहे, प्रकृती प्रेम, हळुवार पणा, नाजूक शब्दात विचारांची गुंंफण आणि प्राणिमात्रांसाठी  करुणा हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्याच शब्दात.. "शब्दांची सीमा उत्तुंग असावी, दिशेच्या पलीकडे, समुद्रापार ती जावी. शब्द केवळ शब्द नसावेत. रंग, रूप, रस, गंध यांनी चैतन्यशील झालेल्या शब्दांना अशी अनुभूती यावी की आकाशाची पुसट निळाई शब्द रंगात तन्मय व्हावी. कधी या शब्दांतून गुलाबाची ऋजुता अनुभवाला यावी व कधी यावी मनाच्या गहन गुहेत समाधिस्त बसणाऱ्या योग्याची गहनता." 
प्रफुल्लता ताईंनी काही व्यंग्य कविता पण केल्या आहेत. 'मुक्तरंग' हा त्यांचा व्यंग्य काव्यसंग्रह. या संग्रहाला देखील कवी फ. मु. शिंदे यांची प्रस्तावना लाभली आहे. या संग्रहात प्रफुल्लता ताईंनी आपला नेहमीचा बाज बाजुला ठेवून, खणखणीत शब्दांत समाजाच्या शोषक वर्गावर शाब्दिक प्रहार केला आहे. 

देवास मधे त्या जाधव दीदी या नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांच्या एक विद्यार्थी अंजली मोघे ज्या सध्या पुण्यात लेखिका व प्रूफ रीडर आहे, सांगतात, "जाधव दीदी म्हणजे एक शांत, सोज्वळ व्यक्तिमत्त्व. अतिशय हुशार. जाधव दीदींनी ज्ञान संपादनासाठी, समाजकार्यासाठी व साहित्यासाठी स्वतः ला वाहून दिले होते. बरीच वर्षे त्यांनी मल्हार स्मृती मंदिर, देवासच्या वरच्या माळ्यावर एका गॅलरीत स्नातक विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवण्या घेतल्या. तेथे त्यांच्यासोबत राजकवी गोविंद झोकरकर पण आम्हाला शिकवायचे. मी त्यांची लाडकी विद्यार्थीनी होते.त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकुणच मला खूप फायदा झाला. आतिशय हळूवार बोलून, खूप छान समजावून शिकवायच्या. त्यांचा जन्म राजघराण्यातला. त्यामुळे ते तेज ते अदबीने वागणं ती लकब त्यांना भेटल्यावर सहज लक्षात येते. विद्यार्थ्यांना देखिल 'आपण' म्हणून संबोधित करत होत्या."

प्रफुल्लता ताईंची राधाकृष्ण संबंधावर प्रकाश टाकणारी कादंबरी गोकुली ही २००१-२००२ मध्ये उत्कृष्ट वाङ्मय रचना म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे पुरस्कृत केलेली कादंबरी आहे. फक्त काल्पनिक कथा  किंवा ऐकलेल्या कथा नसून अकरा वर्षे संशोधन करून, सखोल अभ्यास करून प्रकाशित होणारी ही कादंबरी आहे. या दरम्यान प्रफुल्लता जींने १४ वेळा बरसानाला  (राधेचे जन्मस्थान) जाऊन ऐतिहासिक पुरावे गोळा केले व या आधारे ही कालजयी कादंबरी लिहिली. कादंबरीच्या शेवटी राधेचे व यदुवंशाचे विस्तृत वंशवृक्ष दिले आहे, सोबत छायाचित्रे पण आहेत. खंत आहे की ही कादंबरी खूप लोकांपर्यंत पोहोचली नाही, पण वाचकांनी ह्या कादंबरीला 'ययाती' च्या समांतर ठेवले आहे. अशा या प्रतिभावंत कादंबरीकार स्वतःच्या  कादंबरीत म्हणजे 'गोकुली'त राधे बद्दल लिहितात की राधेचे कृष्णप्रेम आणि कृष्णाचे राधाप्रेम हे रहस्यच राहिले. पुढे त्या सांगतात, मथुरा, वृंदावन, महावन, नंदग्राम, बरसाना या आसमंतात जेव्हा राधेचा शोध घेत विचरण्याची ओढ लागली, तसे राधा अधिकाधिक स्पष्ट होवू लागली. आत्म्याला काही गोष्टी अचानक पटू लागल्या आणि राधेचे कृष्णाच्या प्रेयसीचे चित्र पार पुसले गेले. त्या सांगतात, "कर्मण्येवाधिकारस्ते" हा चिरंतनाचा शोध कृष्णाने लावला आणि राधेने त्याच तत्त्वाचा त्या आधीच शोध घेतला आणि ती कृष्णाची पूजनीया झाली. 

जाधव दीदींचे सुपुत्र श्री दिलिप जाधव यांच्या कडून जी माहिती मिळाली त्या प्रमाणे,जिथे त्या स्नातक विद्यार्थ्यांसाठी वर्ग चालवत होत्या, त्याच जागेवर नंतर त्यांनी तळागाळातील मुलांच्या शिक्षणासाठी 'ज्ञानकुल' ही शाळा सुरू केली. देवासचे प्रतिष्ठित व्यक्ती उदाहरणार्थ राजकवी झोकरकर, आशा डोंगरे, ढोबळे बाई इतर त्या शाळेत शिकवायचे, मुलांना संस्कारित करायचे. याच संस्थेतून महाविद्यालयीन कन्या संस्थेचे वर्ग संचालित करून स्वउपजीविका करणाऱ्या मुलांमुलींसाठी इंग्रजी व हिन्दी माध्यमाची माध्यमिक शाळा संचालित केली. खरंतर ही शाळा आजच्या शाळांसारखी लाभार्जनाच्या उद्देशाने सुरू केली नव्हती, गरजू, निम्न वर्गीय मुला मुलींना शिक्षित करणे हाच एकमेव उद्देश होता. जाधव ताईंनी चाळीस वर्षे 'ज्ञानकुल' या संस्थेचे संस्थापन व संचालन केले. त्यांच्या जवळ आजही ज्ञानाचा अखंड झरा वाहतो. आता त्या खूप थकल्या आहे, पण अजूनही उत्साह दांडगा आहे. त्र्याणवेच्या वयात आजही प्रफुल्लता ताईंचा भारदस्तपणा, वक्तशीरपणा कायम आहे. मध्यल्या काही काळात प्रफुल्लता ताईंनी त्यांच्या घरातच नि:शुल्क वाचनालय पण सुरू केले होते. 

"शब्दरंग" या काव्यसंग्रहाला फ. मु. शिंदे यांची प्रस्तावना लाभली आहे. ते म्हणतात "डॉ. प्रफुल्लता जाधव यांच्या 'शब्दरंग' उत्सवात स्मृतिजत्रेचीही आरास आहे. ही आरास सागराला धरेशी जोडून घेणारी तर आहेच, इंद्रधनूच्या ईप्सित यासारखी रचनेतील मुकेपणाइतकीच बोलकीही आहे." 


१. कधी तरी अन् कुठे तरी !

कधी तरी अन् कुठे तरी 
स्पर्श एकदा असा घडावा
निशिगंधाचा गंध हवेने
झुळुकेमध्ये कैद करावा 
कधी तरी अन् कुठे तरी ॥ १ ॥

आकाशाने असे बघावे 
की धरणीला कंप सुटावा
मूक मनोहर भावरंग ते
क्षितिजावर क्षणभर उमटावे
कधी तरी अन् कुठे तरी || २ ||

व्यवहाराचे नाट्य नसावे
खोल जिव्हाळा झिरपत जावा 
अन् जीवनाला ओल असावी
शब्द मनातून निथळत यावा 
कधी तरी अन् कुठे तरी ।।३।।

सागरास अशी भरती यावी 
चंद्रानेही असे हसावे 
की भरतीच्या लाटेचीही
गोड गोडशी लटपट व्हावी 
तरंगातही रंग भरावा
एक पौर्णिमा अशी असावी 
कधी तरी अन् कुठे तरी ।।४।।

वारा वाहे रुण झूण रुण झूण 
लाटांच्या पायांतही पैंजण 
चंद्ररसाची मत्त मदिरा 
पिऊनी जळाला शुद्ध नसावी 
कधी तरी अन् कुठे तरी ॥५॥ 

२. अनामिक

कधी कधी हा पहाटवारा,
कुण्या सखीवर का रुसतो?
दूर कुठे तर सौधावरती वरती,
पक्षी जोगीया का गातो?

कधी कधी हा गुलाब हसरा,
उदासवाणा का होतो ?
कुण्या अनामिक स्मृतिदंवाचा,
थेंब पाकळीवर गळतो,

कधी मयूर नाचता धुंद नत
होत अचानक का रडतो ?
कुण्या अनामिक स्मृतिदंवांचा
थेंब मातीला गंधवितो..

कधी पूर्व फलकावरी रंगे
अरुण केशरी चित्रभूमी  
सूर्य ढळावा आणि गळावा
कुशल कुंचला करांतुनी

कुण्या झोपडीत हृदयकणांचा
उद दरवळे एकांती
कधी हृदय होतसे शिळा
मग हृदयफुलांची हो माती,

कधी कधी हा गुलाब हसरा
उदासवाणा का होतो?
कुण्या अनामिक स्मृतिदंवाचा
थेंब अविरत ओघळतो.

पंडित कुमार गंधर्व ह्यांचे कबीरचे निर्गुणी भजन हा ताईंचा जिव्हाळ्याचा विषय.. एक महान व्यक्तिमत्त्व दुसऱ्या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल कसे व्यक्त होते, याचे उदाहरण म्हणजे, पद्मविभूषण कुमार गंधर्व यांचे अभिनंदन व मानपत्र समारंभात रचलेले हे गंधर्वगान…

३. गंधर्वगान

हा रंग संगीताचा शब्दांत उतरला
अव्यक्त आकृतीचा घनश्याम रंगला
भृंगही मधूचा आस्वाद विसरला
उंच घेत ताना पुष्पांत पहुडला ।। १ ।।

नाजूक लपेट घेत तो एक विरळ मेव  
नाजूक थरांत विलीन ती तानवलय रेव  
अस्मान धरूनी आणतो कधी पृथ्वीचाच ताल  
कधी पृथ्वीचाच कंठा त्याच्या गळी बहाल ||२||

मोठा प्रचंड मेघ घनघोर बरसतो
कधी सूर्यकिरण रेखांची नक्षी सजवितो
कधी 'हळूच कवडश्याच्या तो झोत फेकतो
कधी संगीताची रूपे अनंत रेखितो ।।३।।

चंद्राघरी अतिथी बनुनी ती उंच तान
गिरक्याच घेत जाई होई तिथेच लीन
तृप्ता हळूच येई वाऱ्यावरून खाली
गाफील अशी ही मैफिल ती तर तिच्याच जागी ।।४।।

कधी चंदनी झुल्यात
तो सूर झुकत राही कोषात रेशमांच्या स्वरतंतू विणत राही
ते तंतू अंतरिक्षी गंधर्वगान गाती
आकंठ पान करूनी मदिरा न संपविती
क्षितिजावरूनी दूर गंभीर हाक येई
व्यक्ती उरे न तेथे पण विश्व झुलत राही ।।५।।

पं. कुमार गंधर्व यांच्या बद्दल व्यक्त होताना प्रफुल्लता ताई म्हणतात -- गोपालकृष्ण मथुरेला जन्मले, पण साध्याभोळया गोकुळाला धन्य करून गेले. आमचे महान आनंदयात्री कुमारजी सुळभावीला कर्नाटकात जन्मले, पण राहिले नांदले देवासला. त्यांची कीर्ती साऱ्या लौकिक परिसरात पसरली. लौकिक जग त्या स्वर्गीय अलौकिक संगीताने भारले. 
(ही कविता त्यांनी पं. कुमार गंधर्व यांच्या पुण्यतिथी ला सस्वर सादर केली होती)

४. एके दिवशी प्रातःकाळी....

एके दिवशी प्रातःकाळी 
यमुनेचा घट कोसळला
गोकुळीचा तो विरहमेघ 
अन्ती आनंदा घेऊनी गेला 
नयन कडांवर चामुंडेच्या 
सुन्दर मोती ओघळला 
मंगल दिन म्हणता म्हणता 
तो सूर-सूर्य मावळला
दिव्य देवीच्या चरणापाशी 
दिव्य सुरांच्या स्वरराशी
सूर हरवता सुरतगरीचा 
देववासी रे वनवासी
एके दिवशी प्रातःकाळी ||१||

कधी तरी अन् कुठे तरी 
गंधर्व गेय इथले रचतो
कधी तरी अन् कुठे तरी 
देववास इथला घडतो
कुमार भाग्याचा अमृतघट 
भानू रश्मीच्या शिरी धरितो 
वसुंधरेच्या करी अर्पुनी 
अमर अभिन्ता साधियतो
एके दिवशी प्रातःकाळी ||२||

रूप अलौकिक गहन गंभीरा 
प्रस्तरी चामुंडा रमते 
तिच्याच चरणी पद्मविभूषित 
कुमार आयन विराजते
भानुकुलाच्या वास्तूतून 
ती गुलाबगंधा दरवळते
शारदीय कौमुदी इथे 
गुणगुणत गीत-घट भरते
एके दिवशी प्रातःकाळी ||३||

इथे मीरेचा मुरली मोहन 
मनभुवनी आनंदवनी
एकतारीच्या ताली गाते 
झीणी झीणी चदरिया बीनी
तुलसीचा उत्तराखंडही 
मालव मातीला कचला
रघुवीर की सुध आयी 
रामरस-रंगी रामप्रभू रमला
एके दिवशी प्रातःकाळी.. ||४||

वीजवाऱ्याची अनोखसंगी 
सप्तसुरी गायनी कळा 
मंजुघोष तो चिरंतनाचा 
अमरत्वाचा रत्नाकिळा 
योगचक्रते मनसुंदरीचे 
अनहद ढोल नगारे नभीचे
वणवण फिरतो मस्त कबीरा 
गुण आलापी निगुर्णीचे 
एके दिवशी प्रात:काळी ||५||

कुमारांची विश्रामस्थली ही 
देववास साधक नगरी  
साधी निरलस महान सिद्धी 
आनंदाच्या वनभुवनी  
द्वार उघडता मनसुंदरीचे 
अनहद ढोल नभी घुमला 
सुळेभावीचा साधक कीर्ती 
व्यापून दशांगुळे उरला 
एके दिवशी प्रातःकाळी ||६||

५. राधा

वृषभांच्या कंठी घुंगरमाळा, 
रुण झुण करिती राधा राधा 
भूमीवरती वलयाकृती धावित 
चक्रे कोरली राधा राधा

अपर्ण शाखांतून अडकते
भूतवाऱ्याचे जीर्ण वस्त्र ते
उरले सुरले धागे दिसती 
कवळुनी घेता फुटली छाती 

धुळीत हिरवी पाने शोधीत
दिसली मजला एक भ्रमिष्टा 
कदंब वृक्षातळी कर्दमी 
खेळत होती राधा राधा

निलकंठी मयुराशी बोले
मेघांच्या ओंजळीत झोले
नयन कडांवर कालिंदीचे
जलघट उपडे विरह नदीचे

जळ ते रायाण कामिनीचे
की निष्पाप शैशवाचे
जळते मृदूल बालभावाचे
की कृष्णबालराधेचे

अर्थ यातुनी निघतो साधा
चक्रे बोलती राधा राधा 
जगात सारे शून्य असावे
शून्य वर्तुळी कृष्ण असावे 
विलीन होता वर्तुळरेषा 
कृष्णानेही राधा व्हावे 

वृषभांच्या कंठी घुंगरमाळा
रुणझुण करिती राधा राधा 
भूमीवर वलयाकृती धावीत 
चक्रे कोरली राधा राधा 
अर्थ यातुनी मिळतो साधा
 युगायुगातून एकच राधा ।।

६. गोपींचा कृष्ण

गोपींचा कृष्ण 
जेव्हा गीता सांगतो 
तेव्हा प्राजक्ताच्या 
पाकळ्यांतून गंध बोलतो 
चंदनवनात चांदणेही 
हळूच उतरते 
आणि अंतर्मनातला नाग 
चंदनाचा संग सोडून 
समाधिस्थ  बसतो.

विराट रूपात तो लपेटतो 
नितळ आकाश-वस्त्र 
कधी-कधी वाटते 
ते त्याने मला द्यावे 
पण माझ्याही मनात 
एक आकाश आहे 
अन् त्यात 
जेव्हा चांदणे उतरते 
तेव्हा आकाशाच्या 
नील गंगेत 
मी नावाचे कुणीही नसते 
आणि तेव्हाही 
अंतर्मनातला नाग 
चंदनाचा संग सोडून 
समाधिस्थ बसतो. 

तो जेव्हा अध्यात्माची 
भाषा बोलतो
ती भाषा मला कळत नाही, 
त्याने केलेला विश्वाचा खेळ 
तर मनाला मुळीच पटत नाही 
पण माझी बोबडी भाषा 
त्याला समजते 
माझा पोरखेळही 
त्याला आवडतो 
पण तेव्हा तोही लहान असतो, 
मीही लहान असते 
सूर्याची आग 
तेव्हा स्फुल्लिंगात सामावते 
आणि अंतर्मनातला नाग 
चंदनाचा संग सोडून 
समाधिस्थ  बसतो.

अनेक कल्पांचा हा धावता रथ
सारथी मात्र तोच आहे 
चालला आहे, चालला आहे 
कुठे जातो माहीत नाही, 
मार्ग मात्र संपतो आहे 
अंतर्मनातल्या नागाची, 
जात कशी अस्सल आहे, 
की विषालाही धारण करून 
कृष्णाला पूजतो आहे, 
गीतेलाही डंख मारून
समाधिस्थ  बसतो आहे!

७. शांत व्हा शांत व्हा

ऑफिसर बनून बॉस व्हा 
नक्कल करून पास व्हा 
हा पीरियड तर सैतानाचा 
शांत व्हा शांत व्हा 
अभ्यासाचे दोनच विषय
 (राजकारणाचेही तसेच)
कुणाला चढवा कुणाला बुडवा 
चढत्या आणि उतरत्या भाजणीत
कुणाला घडवा कुणाला सडवा 
कुणी कुणाचा कान कापतो 
हे गणित चुकू नका 

अभ्यास करतो कारखानीस 
पास होतो फरनांडीस 
हसता काय....? 
कष्टाच्या या मूर्तीला 
भंगल्यावाचून उपाय नाही 
लाच द्यायला पैसे नाहीत 
साथ द्यायला कुबुद्धी नाही 
भास्कराचार्य झोपले आहेत 
तोवर सारे समजून घ्या  
आपण आपली जुनी माणसे 
आधुनिक गणित कळायचे कसे ?
दिवस पहा मान पहा 
हा विषय इथेच सोडा 
शांत व्हा शांत व्हा  

काळजाची सिच्युएशन 
सरळ असेल तर उलटी करा 
कारण उलटे काळीज 
भक्तीलाही युक्ती देते 
भोळ्या भावड्या तुमच्यासारख्या कोंबड्याचाही धर्मासाठी बळी देते
दान म्हणून धनधान्याचा 
पर्वतसुद्धा रचला जातो
स्वाभिमानी सज्जन गरिबाघरचा पोर 
नेमका येथेच चिरडला जातो
म्हणूनच म्हणते, 
सिच्युएशन उलटी करून 
स्वामी व्हा बुवा व्हा 
हा पीरियड तर सैतानाचा 
शांत व्हा शांत व्हा।

८. आकार

भावांना आकार येतो 
आणि शब्द बनतात 
शब्दांना आकार येतो 
आणि काव्य होते 
दगडांना आकार येतो 
आणि शिल्प बनते 
पण माणसाला आकार येतो 
तेव्हा काय होते?

कधी-कधी तो शिष्ट बनतो 
कधी-कधी बुद्धही होतो 
आणि कधी तर माणूसच 
माणसाचा आकार बिघडवून टाकतो! 
आणि म्हणत असतो की 
नवा घाट असाच हवा 
नवा आकार असाच हवा 
आणि तेव्हा.....

पशूंना वाटते, 
किती सुंदर आकार ! 
अगदी आपल्याच सारखा
माकडे म्हणतात, 
आता परत आमच्यात आले! 
वाघ, चित्ते समजतात 
की सावज आता टप्प्यात आले
सिंह तर माणसाला 
माणूस म्हणून खातच नाही 
मच्छर म्हणून सोडून देतो

आणि… 
तेव्हा मच्छरालाही वाटते 
किती सुंदर आकार! 
अगदी आपल्याच सारखा
आता हा मच्छराकार माणूस 
माणसालाच चावेल  
माणूस म्हणून जगला तरी 
मच्छरांसारखाच वागेल !

९. एक वाट कंटाळवाणी

एक वाट कंटाळवाणी 
चालायची आहे.. 
पायात गोळे, सांध्यात चमक
वाट ही दुखावलेली
पण तिलाच तुडवीत 
एक-एक पाऊल उचलायचे आहे… 

मधूनच दिसतो एखादा वड
पाखरांची धर्मशाळा 
त्याच्या सावलीलासुद्धा 
मन डोळे प्रणाम करतात 
विचित्र वट, युगायुगांतली विसंगती 
पण तरीही तो असतो 

त्याचे असणेही किती विचित्र 
पानापानांतून सुखाची सळसळ 
पांथस्थांना सुखवीत आहे 
पण त्यालाही एक वाट कंटाळवाणी 
बिन पायाने चालायची आहे.

१०. अनंत

अनंत जन्मी सुगंध भरला 
अनंत पुष्पे जपुनी ठेविला 
गंध खजिना पुष्प रसाचा 
मला मिळाला, मला मिळाला ॥॥१॥ 

प्राजक्ताची फुले बोलती
गंध रूप रस रंग खेळती 
सुवर्ण चंपक गुलाब हसरा 
वैभव रंगी मोर नाचरा ॥२॥ 

पण हे साधे रूप विरागी 
साधी शुभ्रता शुचिता त्यागी
युगा युगाचा अनंत योगी 
सत्यं शिवं सुन्दरम अभोगी ।।३।।


संकलन : ऋचा कर्पे 














Sunday, March 26, 2023

  








श्रीकांत आरोंदेकर
(५ ऑगस्ट १९४२– २० फेब्रुवारी २०१४)




श्रीकांत आरोंदेकर यांचा जन्म ५ ऑगस्ट १९४२ रोजी इंदौर येथे झाला.  त्यांचे वडील  यशवंत त्रिंबक आरोंदेकर हे, कोंकणातील अरोंदा या गावातून इंदौरला आले होते. त्यांच्या मातोश्री वत्सलाबाई आरोंदेकर या ग्वाल्हेर जवळ असलेल्या सबलगड ह्या गावाच्या होत्या. आपल्या आईवडिलांबद्दल आणि कुटुंबाबद्दल श्रीकांतजी सांगायचे की आई वडील दोघेही कमी शिकलेले आणि  लहान गावातून आले असले तरी दोघांनी मुलांचे आयुष्य घडविण्यात काहीही उणे भासू दिले नाही. श्रीकांतजींचे वडील अत्यंत व्यवस्थित आणि स्वाभिमानी पुरुष होते.इंदौरच्या लाल इमली शोरूम मध्ये  नोकरी करून त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालन पोषण केले. आपल्या आईबद्दल ते सांगायचे की  त्यांची  आई म्हणजे अत्यंत हुशार बाई. ती  सुगरण, व्यवहार कुशल तर होतीच , त्यासोबत त्याकाळी सुद्धा दांडगं सामान्य ज्ञान  असणारी व  काळाच्या पुढे चालणारी होती.  तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आम्हा सर्व भावंडांवर अत्यंत मोठा प्रभाव आहे. 

 सहा भाऊ बहिणींच्या कुटुंबात श्रीकांतजी दुसऱ्या क्रमांकावर जन्माला आले होते. त्यांचे बालपण एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. स्वतःबद्दल बोलताना ते नेहमी सांगायचे की आमच्या बालपणी जरी भौतिक सुखांच्या अभाव होता तरी आमचं बालपण खाणंपिणं आणि नाते जोपासणं या दृष्टीने अत्यंत आनंदाचं होतं. श्रीकांतजीं चे बालपण खातीपुरा रोड इंदौर येथे गेले. पहिले, मराठी माध्यमिक विद्यालय आणि नंतर महाराजा शिवाजीराव हायर सेकंडरी स्कूल येथून शालेय शिक्षण घेतल्यानंतर,त्यांनी इंदोर ख्रिश्चन कॉलेज येथून बीकॉमची पदवी घेतली. कौटुम्बिक अडचणींमुळे त्यांना वयाच्या सोळाव्या वर्षी पासून नोकरी करावी लागली त्यामुळे, अभ्यासामध्ये जरी हुशार असले तरी परीक्षांमध्ये ते नेहमी साधारण विद्यार्थी ठरले.

मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांना वडिलांनी इंदौर बँकेमध्ये काम करत असलेले आपले एक मित्र खान चाचा यांच्याकडे पाठवलं. या मुलाखतीचा उद्देश असा होता की खान चाचा जे स्वतः इंदोर बँकेत चपराशी  म्हणून नोकरी करत असत, ते श्रीकांतजींना इंदूर बँकेत चपराशी म्हणूनच नोकरीसाठी मदत करू शकतील.  जेव्हा श्रीकांतजी खान चाचा यांना भेटले तेव्हा खान चाचांनी जणू भविष्य वर्तले  " तू तो मॅट्रिक पास है, चपरासी नही बाबू बनेगा". अशा प्रकारे विविध जागी नोकरी केल्यानंतर सन १९६१ साली त्यांची  स्टेट बँक ऑफ इंदौर मध्ये गोडाऊन क्लर्क म्हणून नेमणूक झाली आणि मग त्यांनी मागे वळून बघितले नाही. 

सन १९६१ पासून २००१  पर्यंत म्हणजे तब्बल ४०  वर्ष त्यांनी स्टेट बैंक ऑफ इंदौर आणि त्यानंतर बैंक ऑफ इंडिया या संस्थांना  दिले. त्यांची बैंक ऑफ इंडियात निवड होण्याची कहाणी पण खूप गमतीशीर आहे. बीकॉमची परीक्षा तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे बैंक ऑफ इंडिया यांना कारकूनाच्या पदावर घेण्यासाठी तयार नव्हती, परंतु कारकूनाच्या भरतीसाठी जी परीक्षा बैंक ऑफ इंडिया घ्यायची त्या परीक्षेत श्रीकांतजींनी संपूर्ण मध्यप्रदेशात  उच्चांक गाठला होता आणि विशेष म्हणजे ह्या परीक्षेत जो परीक्षार्थी त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी आला होता तो त्यांच्या सहपाठी होता आणि त्याने बीकॉम मध्ये  स्वर्ण पदक मिळविले होते. बैंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना संधी द्यायचं ठरवलं आणि नंतर श्रीकांतजींचं नाव बैंक ऑफ इंडिया मधील प्राविण्य असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सामील झालं.

बालपणापासून ते सेवानिवृत्ती पर्यन्त श्रीकांतजींचं  जीवन संघर्षमय राहिलं, तरीही त्यांच्या आतील एक कवी हृदय असलेलं व्यक्त्तीमत्त्व  कधीच थकलं नव्हतं. सन १९६० मध्ये वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली पण ती वाचल्यावर ती पहिली आहे असं अजिबात जाणवत नाही. त्या नंतर पन्नास वर्षे काव्य मनातच राहिले आणि २०११ मध्ये पुण्याच्या इस्पितळात असताना कवितेनं पुन्हा त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला.  बैंकेतून सेवानिवृत्त  झाल्यानंतर जवळपास १२ वर्षांनी सन २०१३ मध्ये  श्रीकांतजींनी आपला पहिला आणि दुर्दैवाने शेवटला  काव्यसंग्रह "श्रावणसरी" या नावाने काढला.संग्रहात ज्या कविता आहेत ती  फक्त दोन वर्षाची कमाई आहे, जी श्रीकांतजी आपल्यासाठी सोडून गेले. ह्या दोन वर्षात ते कवितेत किती गुंतले होते ते त्यांच्या कविता वाचताना कळतं . 
श्रावणसरीच्या मनोगतात ते कवितेबद्दल सांगतात की मनात येईल त्याला काव्यरूप द्यावे आणि त्यात धुंद व्हावे , असा जगण्याचा श्रावण करणारा हा एक छंद आहे हे मला उमगलं आहे.  ह्या सुंदर श्रावणात त्यांनी भिजावं, भिजवावं आणि धुंद व्हावं हे नियतीच्या मनात नव्हतं आणि पुस्तक प्रकाशनानंतर अवघ्या सहा महिन्यात २० फेब्रुवारी २०१४ ला त्यांचे निधन झाले. 

श्रीकांतजींच्या कवितांमध्ये त्यांच्या जीवनातला संघर्ष स्पष्टपणे आढळतो. मग ते  बैंक युनियन मध्ये आलेले  अनुभव असतील, किंवा प्रकृती बरी नसताना  रुग्णालयात आलेला  अनुभव असो,  त्यांच्या कवितेमध्ये हे सगळं दिसून येतं तरी जीवनाने दिलेल्या कटू अनुभवांत  सुद्धा त्यांच्या आतील एक अत्यंत सकारात्मक व्यक्ती जिवंत होती . जीवन कसं जगायचं हे त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला. त्यांच्या  कवितांमध्ये निसर्ग सौंदर्य,नातेसंबंध,मृत्यूची संकल्पना असे अनेक संदर्भ येतात. ओवी, मुक्तछंद व छंदबद्ध रचना, गझल या सर्वांतून त्यांचा काव्य प्रवास दिसून येतो आणि अनेक स्पंदनातून वाचकांशी हितगुज करतो. 


१.अधिष्ठान

देह आत्म्याचे घर 
मन खिडकी घराची 
कुविचारा सुविचारा 
पलीकडे पाहण्याची 

खिडकीतून येई आत 
ज्ञानाचा प्रकाशझोत 
पुष्पगंधित हा वारा 
भिरभिरे या घरात 

ऊन कोवळे पिवळे 
जर्द नेसून सोवळे 
भक्तिभावाचा सुगंधी 
धूप जैसा दरवळे 

खिडकीतून बघावे
निळ्या रंगाचे आकाश 
चंद्र बसे मोजायला 
त्याच्या चांदण्याचा कोष 

आत्मारामाचीच पूजा 
बांधू मन गाभाऱ्यात 
सौख्ये सुख शांती नांदो  
सदोदित या विश्वात 

माझे मंगल गायन 
भक्ती भाव अनुष्ठान 
मांगल्याने व्यापले हे 
ईश्वराचे अधिष्ठान


२.माझ्या माऊलीचे घर 

माझ्या माऊलीचे घर 
सर्व सुखाचे आगर 
वात्सल्याची खाण जेथे 
माया पाखरण वर 

दूर माऊलीपासून 
राहिलो मी फार काळ 
आता माऊली बोलवे 
ये s रे ये s रे येरे बाळ 

माझ्या आईच्या कुशीत 
घेतो मी झोप निवांत 
उद्वेगाचे नाव नाही 
सारे कसे शांत शांत 

ज्ञानाचा प्रकाश येथे 
उजळितो माझे घर 
मांगल्य नांदते इथे 
हरिहराचा वावर 

माझी माऊलीची भेट 
आता व्हायची लवकर 
लागली माझ्या मनासी 
गोड गोड हुरहूर 

माऊलीच्या घरी जाया 
नाही लांबचा प्रवास 
डोळे मिटा क्षणभर 
चित्ती माऊलीचा वास



३.ते आणि मी

शब्दांचे शर त्यांच्या हाती 
समोर माझी उघडी छाती 
मी 'वाली' मानून 'राम' ते 
झाडा आडून बाण मारिती 

माझ्या बाजूस मीच एकटा 
त्यांच्या संगे शकुनीमामा 
त्यांची चौसर त्यांचे फासे 
मिळून चालू द्या हा हंगामा 

वृश्चिकदंशी सर्पाचे विष 
मी नाही पण 'भोले शंकर'
नको फुकाचे मोठेपण हे 
दूरच ठेवा विष भयंकर 

उचलायला शक्ती न उरली 
दिखावटी प्रेमाची पोती 
व्यर्थ सांत्वना देणारी ती 
नकोत फसवी नातीगोती 

आता माझा मार्ग एकला 
आनंदे मज नाचू गाऊ द्या 
सिंहासन लखलाभ तुम्हाला 
निवांत मजला झोप घेऊ द्या.

४.श्रमिक आणि धनिक

दिवसावर गाजवून सत्ता 
अस्तपंथ रवी होई 
दमल्यानंतर घरी जायची 
तयास असते घाई 

उन्हात राबून संध्याकाळी 
श्रमिक मोकळा होतो 
तो निढळाच्या घाम फुलांची 
डाळ भाकरी खातो 

दोन घोट मदिरेचे प्राशून 
गरीब झोपी जातो 
'आज' लढविणे असते त्याला 
घोर उद्याचा नसतो 

धनी उद्याची चिंता करितो 
जागून साऱ्या रात्री 
तरी तयाला कधीच नसते 
पहा कशाची खात्री 

लहान चोरांसाठी शिक्षा 
मोठ्यांच्या हाती सत्ता 
पाय पकडूनी मते मागती 
अंती झाडती लाथा 

ह्या मोठ्यांचा लगाम घेऊ 
चला आपल्या हाती 
गमवायला काही नसता 
उगाच कशाची भीती.

५.विस्तार 

मी होतोय निळं आकाश 
अनंत असीम 
हाताला न गवसणारं 
कवेत न येणारं 
छत्र जगावरचं 
मला अभिमान वाटतो 
मी आकाशासारखा 
अनंत असीम पोकळ शून्य 
शून्यातूनच ब्रम्हांड निघालंय म्हणे 
माझ्यातूनही निघेल कदाचित 

हे विस्तारणं 
मोठं विशाल असीम होणं 
नांदी असेल का 
माझ्या लवकरच विखुरण्याची 
देहाच्या पंचतत्वात विलयापूर्वी 
अनंताशी हा मानसिक विलय 
सर्वांनाच लाभतो का 
का ही आध्यात्मिक उन्नती 
का कविता प्रसवतेय 
शून्यात गुंता वाढतोय 
काहीतरी घडतंय 
अनाकलनीय. 

६.बाग आणि वन… 

बाग म्हटलं 
की फुलझाडं आलीच 
आणि येतात 
क्रोटंस शोभेचे 
वृक्ष मात्र थोडेच 
छाया देणारे 
किंवा श्रावण झुले 
टाकता येणारे 

वृक्ष असतात वनात 
मी पाहिलंय वन 
आणि मोठे मोठे वृक्ष 
उत्तुंग कल्पनांचे 
जमीन फाडून 
खोल शिरलेल्या 
त्यांच्या पारंब्या 
कवीच्या दाढीसारख्या 

हे वन आहे 
कल्पद्रुमांच 
मी विणतो 
गोफ शब्दांचे 
आणि शब्द वेचायला येतोच 
कल्पद्रुमांच्या वनात 
शब्द प्राजक्ताचा सडा 
नेहमीच असतो तेथे. 

७. निराशा (वयाच्या १८व्या वर्षी लिहिलेली पहिली कविता)

दुःखाचे डोंगर जीवनी या 
अश्रूंच्या वाहतात नद्या 
काल निघाली अंधारातून 
अंधारातच आज उद्या 

दिवस कालचा दारिद्र्याचा 
आज अजूनही दरिद्रीच मी 
नव्या काळचा नवा सुदामा 
दरिद्री असूनही मित्रविहीन मी 

काल उपाशी आज उपाशी 
आणि उद्याची चिंता प्रभूशी 
दैव धावते पुढे योजने 
मैत्री माझी दुर्दैवाशी 

क्षितिजावरही प्रकाश नाही 
दीप नसे या दुर्गम मार्गी 
मृत्यूलोकी या फक्त निराशा 
आणि सुखाची आस न स्वर्गी.

८ .उर्मी 

मेंदूच्या मज्जातंतूच्या 
अस्ताव्यस्त वर्दळीतून 
सलामत बाहेर पडणं 
केवढा मोठा ताप 
दार बंद असताना 
भिंत तोडण्यासारखं 
पण वेदना मार्ग काढतात 
आणि बाहेर पडतात 
शब्दांना शोधत 
शब्द खेळतात लपाछपी 
तगमग वाढते जीवाची 
कधी कधी वेदनाच हरवतात 
मग लपण्यात अर्थच नसतो 
शब्द न्हातात वेदनांच्या पावसात 
मग काव्य भाव अंकुरतो 
आणि कवितेचा जन्म होतो 
बाळाला अलगद ठेवतात 
कागदाच्या गादीवर 
बाळाला काजळ तीट पावडर 
बाळ हळूहळू वाढतं 
बारशाला बाळाचं नाव ठेवतात 
असं येत शीर्षक कवितेचं. 

९ .स्वयंभू 

देहाच्या क्षितिजापार 
प्राण्यांची आगळी वस्ती 
जेथे न मृत्यूची धास्ती 

आकाशी चंद्र मिरवितो 
तार्‍यांची कंठी माळ 
मग धावत येई सकाळ 

या डोंगर माथ्यावरती 
घन घोर दाटून आले 
नक्षत्र मृगाचे ओले 

उद्दिष्ट सारखे नसता 
मैत्रीचा सरला योग 
आपुल्या कर्माचा भोग 

शिरच्छेद सैनिकांचे 
शांतीच्या तरीही गप्पा 
हा पाकनितीचा टप्पा 

ते नृत्य बहरले असता 
पायातील तुटली  चाळ 
कोणावर घ्यावा आळ ? 

कवितेच्या ओळीत आल्या 
शब्दांनी मोहरून यावे 
हे काव्यस्वयंभू व्हावे !

१० . व्याधी

झाडावर नवखे फुल 
भाराने तुटली फांदी 
ही नश्वरतेची नांदी 

वेळूच्या बनातील पाने  
ह्या  घरात आली कैसी ?                        
वाऱ्याची ऐसी तैसी 

तू प्रथम भेटली मजसी 
तव गाली खुलली लाज 
कां  पिवळा पडला ताज ? 

मसणात सुचे वैराग्य 
बदले न कुणाचे भाग्य 
ही दगडावरची रेघ 

मी क्लांत  इथे निजलेला 
लिहिलेली कविता अर्धी 
ही जन्मभराची व्याधी

११ . शोध

"काय शोधताय ?"
"ईश्वर"
"मिळाला ?"
"नाही" 
"पोलिसात रिपोर्ट दिली ?"
"पेपरात जाहिरात दिली ?"
"फोटोसकट द्या" 
"काय फोटो नाही ?"
"स्केच तरी द्या" 
"पण आम्ही कुठे पाहिलंय ?"
"मग कसं शोधताय ?"
"मागायचं आहे त्याच्याकडे" 
"तो देतो का ?"
"हो, सर्वांनाच"
"मग तुम्हाला दिलं असेलच ?" 
"अजून हवंय"
"कां ?"
"बऱ्याच जणांना दिलंय"
"आणि कमी ?"
"बऱ्याच जास्त लोकांना" 
"तुमच्यातलं थोडं द्याल त्यांना ?"
"कशाला ?"
"त्यांना अगदीच कमी मिळालंय"
"भाग्य त्यांचं" 
"देव आणखी देईल तुम्हाला" 
"काय भरवसा ?"
"कुणाचा ?"
"देवाचा"


संकलन : अलकनंदा साने










Sunday, January 1, 2023







पराग देशपांडे

(९/९/१९४६ - - २/२/२००१)


  पराग देशपांडे यांच्या आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही आणि बरेच प्रयत्न करून देखील ती मिळवता आली नाही. त्यांच्या कवितांचं वैशिष्ट्य असं की बहुतेक कविता त्यांनी पोपट ह्या पक्ष्यावर लिहिल्या आहेत. पराग देशपांडे यांच्याबद्दल जेव्हा ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे  यांना कळलं तेव्हा त्यांनी त्यांचं पुस्तक "शुकसंवाद" प्रसिद्ध करण्याचा मानस व्यक्त केला आणि त्या दृष्टीने हालचाल सुरू केली. अरूण म्हात्रे यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे की


"त्याचा शुकसंवाद....’’


 मुंबईतून मध्यप्रांतात गेलेला आणि नंतर तिथेच स्थायिक झालेला पराग देशपांडे, हा केवळ भौगोलिक अंतरामुळेच महाराष्ट्राला नि मराठीला अपरिचित राहिला.
 तसा त्याचा स्वभाव अबोल, गर्दीत न मिसळण्याचा वागणं खानोलकरी आत्ममग्न आणि लीन. कवितेत तो बालकवींसारखा निरागस निराश. वातावरण सुटलं नि कदाचित, त्यानं इंदूरमधलं सुप्रसिद्ध नेहरु उद्यान आपल्या विरंगुळ्याचं ठिकाण बनविलं. पहाट, त्या उद्यानात पोपटांच्या कलरवांनी उजळते नि संध्याकाळही, त्यांच्याच चित्कारात विरते. त्या बागेने, त्या राव्यांनी, परागला जिवंत ठेवलं. धगधगत ठेवलं.  त्याच पक्ष्यांच्या थव्यांशी पराग देशपांडेने केलेला संवाद तोच हा  शुकसंवाद."

दुर्दैवाने हे पुस्तक प्रकाशित होण्या आधीच पराग देशपांडे यांचे अकाली निधन झाले. 

पराग देशपांडे यांच्या बद्दल जी अल्प माहिती आहे त्याप्रमाणे त्यांचा जन्म  मुंबई येथे झाला. ते मुंबईतच लहानाचे मोठे झाले. सत्तरच्या दशकात  सुप्रसिद्ध हिन्दी नाटककार मोहन राकेश यांचे गाजलेले  नाटक "आधे अधूरे" इंदौरला खेळले जाणार होते तेव्हा जेष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांच्यासोबत प्रथमच ते इंदौरला आले.  पराग यांनी नाटकात काम केलं होतं का किंवा त्यांची काही भूमिका त्या नाटकात होती का याबद्दलही काही माहित नाही. त्यावेळेसच बहुधा त्यांना इंदौर आवडलं आणि ते १९७९ मध्ये इंदौरलाच स्थायिक होण्याच्या दृष्टीने परत आले.  इंदौरला त्यांनी स्क्रीन पेंटिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई येथील पदवी होती. त्यांच्या ह्या कलेचा सकारात्मक उपयोग इंदौर येथील शंभर वर्षांहून जुनी संस्था महाराष्ट्र साहित्य सभेत झाला. म. सा. सभेचा  सुरेख लोगो पराग देशपांडे यांनी बनवला. त्यासाठी महाराष्ट्राचे त्या वेळीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते पराग यांना सन्मानित करण्यात आले होते . 

 त्यांना प्रकृती बद्दल विशेष प्रेम होतं, निसर्गासोबत राहणं त्यांना आवडत असे. फाईन आर्टच्या पदवीचा स्क्रीन पेंटिंग मध्ये त्यांना भरपूर उपयोग झाला आणि त्याच दरम्यान नव्वदच्या  दशकात ते कविता लिहायला लागले. त्यांचा मुलगा आल्हाद  त्यावेळेस अगदी लहान साधारण चार-पाच होता. ते त्याला घेऊन इंदौर येथील नेहरू पार्क मध्ये जात असत आणि तिथेच त्यांना शुकसंवाद सुचला. ते ओंकारेश्वरला जाऊन नर्मदा किनारी बसून पाण्याचा आवाज मनसोक्त ऐकायचे. उडणाऱ्या पक्षांना पाहून नि त्यांचे आवाज ऐकून ते  सुंदर कविता लिहीत असत. पराग देशपांडे यांचं अक्षर देखील अत्यंत सुंदर होतं. कवीवर्य अरूण म्हात्रे यांनी त्यांच्या ''शुकसंवाद'' पुस्तकात ह्या सुंदर अक्षरांचा सुरेख उपयोग केला आहे. पहिल्या आणि शेवटच्या मलपृष्ठावर त्या कवितांचे काही अंश जसेच्या तसे छापले आहेत.एक आजाराचं निमित्त होऊन २ फेब्रुवारी २००१ला  त्यांचे अवेळी निधन झाले आणि मराठी भाषा एका अप्रतिम साहित्यिकाला मुकली. 

१.
नेते कविताच दूर 
आणते कविताच जवळ 
आपल्यापासून आपल्याला 
कवितेच्या लागवडीत असलेली 
मनातली भूमी 
तेवढ्यानेच तृप्त चिंब होते 
आणि तेवढ्यानेच तडकते 
मरूभूमीतल्या संतप्त
वाळवंटा सारखी 

डोळ्यात तहान नसते 
पायात भान नसते 
तेव्हाच कविता फिरवत असते.

२.
हा तळ्याचा काठ आणि 
ही लहर बंदिस्त त्याची 
सांगते अवघी कहाणी 
संपलेल्या पावसाची 

आटला आहे जिव्हाळा 
माणसातील माणसाचा 
सांगण्याचे टाळले तू 
कोण माझा मी कुणाचा 

गच्च भरला माळ हिरवा 
हा तरुंनी वेढलेला 
दाट चिंचाचा पसारा 
हा फुलोरा वाढलेला  

आमराई किर्र आहे 
निलगिरीचे रान भवती 
जांभळ्या रंगातूनि ये 
पूर्णतेला आज भरती 

वाकली झाडे मुळाशी 
पायथ्याशी प्रीत आहे 
पाखरांच्या धुंद ओठी 
या तळ्याचे गीत आहे 

हा तळ्याचा काठ आणि 
ही लहर बंदिस्त त्याची 
सांगते आहे कहाणी  
भोवतीच्या वैभवाची.



३.
थांबून थांबून ओरडत राहतात 
ओरडून ओरडून थांबत राहतात
स्वतःभोवती गदारोळ करीत राहतात
गदारोळातून पुन्हा उभी राहतात

गदारोळ विस्कटला की विस्कटून जातात 
विस्कटलेल्या छिन्नभिन्न स्वरात 
कसले गीत गात असतात 
त्यांचे सुस्पष्ट आवाजभोवती उमटत असतात
लकेरींवर लकेरी उठतात आणि थांबतात
यातच ती कुठेतरी असतात. 
एखाद्या उण्यादुण्या स्वरानेच 
ती आपले व्यक्तिमत्त्व उभे करीत असतात.

पाखरे स्वतः गात असतात 
पाखरे स्वतःभोवती गात असतात.

४.
तूच ओरडत होतास का 
पाखराच्या रूपात 
बागेतल्या झाडा आडून 
राहून राहून 
तुझा उत्साही चित्कार 
फांद्यांमागून 

किती उत्साहाने 
चित्कारतात ही पाखरे 
घोळक्या घोळक्याने पानांमागून 
कसा थकवा जाणवत नाही 
शीण वाटत नाही 
अव्याहत चित्कारणाऱ्या 
या पाखरांना 

आणतात तरी कुठून 
ही पाखरे 
इतका दुर्दम्य उल्हास 
गोठवून टाकणाऱ्या भर हिवाळ्यात 
कार्तिका-शिशिरातल्या 
उद्दाम काकुळतीच्या काळात 
अजीजीने करुणा धरावी 
जिजीविषा टिकविण्यासाठी 
असल्या कठोर हंगामात 
पावसा-वसंताच्या 
हर हंगामी फुलत्या ऋतूत 
चढत्या उतरत्या मोसमात 
किती सातत्याने चित्कारत असतात 
ही पाखरे 
भोवती आनंदाचे अनाहत 
कवच ठेवून 

कधी कधी वाटतं 
असलासच तू तर 
यातच असशील.

५.
कसं जगावं उदासवाणं 
हे फांदीवरल्या 
एकट्या पाखराला कळतं 
रंगांचं उदासवाणं इंद्रधनुष घेऊन 
पाखरांनी यावे बंड करून 
जसा वादळी वारा येतो उधळून 

मनातले खोल पाखरू 
उदासवाणे बसलेले असते 
कधीचे शीळ घालीत पाखरांना 
भोवती पाखरांच्या घोळ बराच असतो 
पण कोणी धजत नाही 
जवळ यायला 
फांदी फांदीवर 
बसतात पाखरे निमूटपणे 

त्यांचा वाऱ्यावरही आवाज नसतो 
तसा त्यांचा पत्ताच नसतो कुणालाही 
गाणे बंद करून 
बसलेले असतात निरागसपणे 
ही अद्वैती पाखरे 
यांचे कुणाशीच वैर नसते 
फांदीवर झुलताना 
ऐसपैस बागडत असतात 
तेव्हा यांचे रूप डोळ्यात भरावे 
असे असते 
कुठल्यातरी दूरच्या 
राखीव चित्रात पाहिल्यासारखे 

पंखातून इंद्रधनु छटा 
उलगडत जाणाऱ्या वायूचे 
हिरव्या वर हिरवे तळ 
वर पुसट काळ्या रेघांचे वाहते जळ…

६.
आज पक्षी दूर येथून जाऊ दे 
फक्त हे आभाळ सोबत राहू दे

माघ भरले जर्द हळवे उन हे 
गर्द पसरून भोवताली राहू दे

लाल पाचोळा फुलांचा रांगता 
पाय त्याचे या इथे रे वाजू दे

तळमळीने वाहू दे वाहता प्रहर 
बिंब त्याचे या इथे रेंगाळू दे 

आणि या शेजेवरी हिरव्यातृणी 
जांभळा भवबंध ऐसा राहू दे

आज पक्षी दूर कोठे जाऊ दे 
आभाळ हे नुसतेच वरती राहू दे

७.
पहिल्या पहिल्या वाऱ्यावर 
गळून पडणाऱ्या 
या बागेतल्या 
सोनेरी फुलांनाही 
अजून आयुष्य हवे होते 
टपटपून सोडून देतात 
जशी झाडे आपल्या कुशीतून 
तसे गळणे नको होते 

कोकिळेच्या गुंतागुंतीच्या 
त्या तशा त-हेवाईकपणात गुंतून 
अजून  झुलणे हवे होते 
दाही दिशांच्या प्रतिकात्मक केसर रानातून 
अजून अक्षय मूळजड हवे होते 

सुकुमार देहाच्या पंचकोशातून 
अजून फांदीला बिलगणे 
लहरणे हवे होते 

गर्द राईत दडल्या फांदीआडच्या 
कोकिळेचे कुहूकुहूचे 
जीवन गाणे हवे होते 

वाहत्या कंठाच्या 
मदहोश पाखरांच्या 
धुंद अव्याहत मादक 
कुहूकुहूची स्वर कंपने 
देहावर कोरीत 
अजून तसे धुंद बहरणे हवे होते 

वाऱ्यावर घुसळत्या 
मुलायम मोरपिशी 
नक्षीच्या सोबती पानांचे 
आल्हाद स्वप्निल वासंती लयस्पर्शी 
लहरणे हवे होते.

८.
अ.

तू असशीलच यावर 
विश्वास तरी कसा ठेवावा 
तू नसशीलच 
आता तळ्यावर गूढ 
शांतता पसरतेय 
सर्व दृश्य माझ्यासमोर 
विलय पावणार आहे 
मला एकट्याला अंधारात 
गूढ अचल निर्दिष्ट ठेवून 

तू नसशीलच ! 

आ.

न पेक्षा तुला शोधणे 
दिगंतरी 
दिग् भ्रमित होऊन भटकणे 
इतस्ततः इथे तिथे 
ठायी ठायी …

जर तरचे मुलामे लेपून 
तुला शोधणं शक्य नाही 

असलासच तर तू 
इथे कुठेतरी असशीलच !

९. 
ते झाड मुक्याने फुलले ते झाड तोडले कोणी 
जे उभे इथे झोकाने ते झाड तोडले कोणी 

जे बहराने थबथबले जे शाखांनी गजबजले 
जे झाड एकटे जगले ते झाड तोडले कोणी 

पक्ष्यांची गजबज होती चोचींची चिवचिव होती 
आनंद निखळ देणारे हे झाड तोडले कोणी 

पानांना सळसळ होती सुखशीतल हिरवळ होती 
जे हसले आनंदाने ते झाड तोडले कोणी 

हे झाड इथे रुजलेले ते झाड तोडले कोणी 
जे उभे इथे झोकाने ते झाड तोडले कोणी

१०.
पोपटी चित्कार मजला आज उमगू लागले 
या मनाच्या पार पोचून वेध घेऊ लागले 

सांजवेळी शब्द त्यांचे आज उमजू लागले 
एकट्याने काय मजला भान देऊ लागले 

झाड वठले एकटे हे स्तब्धसे शिशिरात 
या सांजवेळी दाटताना पान ढळू लागले 

चार रावे राहिले होते तिथे फांदीवरी 
समजुनी माझ्या मनातील गीत गाऊ लागले.

११.
तळ्यावरी बोबडी उन्हें की 
हळू रांगती कोवळी मुले ही 

पायसम अवघ्या पृष्ठाला 
चमचमता दिपदिप उजाळा 

बोट फिरवुनी अलगद त्याचा 
वर्ख कुणाला टिपता यावा 

तळ्यावरी एकांत अबाधित 
साऊलवसती असते जेव्हा 

बाळबोध शाळेतील हळवी 
स्मृतीत जपली कविता तेव्हा 

पडछायांचा निळा ताजवा 
अंकित होई मनात तेव्हा 

ध्रुपद झाले सरमिसळींचे 
ऊन तळ्यावर अभंग दिसते 

तळ्यावरी बोबडी उन्हे ही 
जणू कोवळी लाल फुले ही....

संकलन : अलकनंदा साने

    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...