चंदेरी मुलाखत

 या वर्षाच्या सुरुवातीपासून माय-मावशी समूहात जे नवीन उपक्रम सुरू केले आहेत ,त्यातीलच एक उपक्रम थोड्या नवीन पद्धतीचा आपण सुरू करत आहोत. उपक्रमाचे नाव आहे चंदेरी मुलाखत, ज्याच्यात माय-मावशी, आम्ही रचनाकार या समूहातील  सर्व साहित्यिकांचा दृक-श्राव्य माध्यमातून  मनमोकळ्या गप्पा म्हणजेच व्हिडिओ कॉल वर मुलाखत घेऊन सर्व साहित्यिकांची माहिती, साहित्यिक क्षेत्रातील काही उपलब्धी असतील तर त्या बद्दल माहिती व त्यांच्या निवडक रचना असा एक वीस ते पंचवीस मिनिटाचा कार्यक्रम रेकॉर्ड करून युट्युब वर  "आम्ही रचनाकार"  ही वाहिनी बनवली आहे , त्यात अपलोड करत आहे.  

या उपक्रमामागे मानस असा आहे की समूहाशी संबंधित साहित्यकारांची माहिती त्यांच्या निवडक गद्य व पद्य रचना या फक्त समूहात नव्हे, फक्त बृहन महाराष्ट्रात नव्हे, फक्त महाराष्ट्रात नव्हे तर जगात कुठेही, कोणापर्यंतही पोहोचाव्यात .कोणीही यूट्यूब च्या माध्यमातून या मुलाखतीचा आनंद घेऊ शकेल.

आज पासून या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे वर सांगितल्याप्रमाणे उपक्रमाचे नाव आहे "चंदेरी मुलाखत" हा उपक्रम अर्थातच आपल्या समूहाच्या संचालिका अलकनंदा साने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत आहे. 

सुषमा ठाकूर 
२९/०३/२०२२ 

 साठाव्या भागापासून ह्या उपक्रमाची धुरा आभा निवसरकरने सांभाळली आहे. 



१.  आपल्या या उपक्रमाचा शुभारंभ करत आहोत आपल्या समूहातील जेष्ठ श्रेष्ठ साहित्यिक श्री सूर्यकांत कुलकर्णी काका यांच्या मुलाखतीने.
कुलकर्णी काकांनी सामाजिक ,सांस्कृतिक आणि ग्रंथालयाच्या व्यवसायाशी निगडीत क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. अतिशय शांत स्वभावाचे, समर्पित व्यक्तिमत्त्वाचे व गरजूंना केव्हाही मदत करण्यास तयार असे कुलकर्णी काका आज वयाच्या 92 व्या वर्षी सुद्धा अत्यंत सक्रिय जीवन जगत आहेत .त्यांचे आदर्श व गौरवास्पद जीवन  पाहून आम्हा सर्वांना स्फूर्ती मिळेल ही मनीषा ठेवून त्यांची मुलाखत घेतलेली आहे.



२.  उपक्रमातील दुसर्‍या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एका गोमंतकीय उत्कृष्ट साहित्यिकेला, म्हणजेच आदरणीय रेखा मिरजकर यांना. रेखा ताईंच्या बऱ्याच पुस्तकांना गोमंतक मराठी अकादमीचे अनुदान, साहित्य पुरस्कार इत्यादी मिळालेले आहे. 
 
३. तिसऱ्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील   एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला, जे अभिनेता, दिग्दर्शक लेखक, संगीतकार, गीत लेखक, पार्श्वगायक, सूत्रसंचालक, पत्रकार, कलासमीक्षक आहेत. याबरोबरच एक अत्यंत संवेदनशील कवी म्हणून याची ओळख सांगता येईल. ते आहेत विवेक सावरीकर . 


४. चवथ्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील  इंदूर येथील एका उच्चविद्याविभूषित साहित्यिकेला जिला सुवर्ण पदक , रजत पदक प्राप्त झालेआहे. तसेच  वक्तृत्व , लेखन, कविता, कथालेखन, निबंध , अनुवाद , समीक्षा लेखन ह्या सर्वांत प्राविण्य मिळवूनही अत्यंत निगर्वी  व्यक्तिमत्व असलेल्या अपर्णा भागवत यांना  .

https://youtu.be/Slpno9n1cAo


५. पाचव्या  भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील ज्येष्ठ , श्रेष्ठ कविवर्य सुधीर बापट यांना . आपल्याला माहित आहेच की  सुधीर बापट यांच्या कविता या अत्यंत तलम , रेशमी , अर्थपूर्ण , निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या व छंदात्मक , नादपूर्ण असतात . 

https://youtu.be/-u8P8cNNCko

६. सहाव्या  भागात आपण भेटणार आहोत समूहातील ज्येष्ठ , श्रेष्ठ साहित्यिक  निशिकांत कोचकर यांना. कोचकरजी हे गेल्या ३५ वर्षांपासून हिंदी मधून कविता, गझल, कथालेखन, नाट्यलेखन व नाटकात अभिनय करत आहेत. 

https://youtu.be/fc85HZ0Hz_I

७. सातव्या  भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एका हळूवार मनाच्या कवयित्रीला, म्हणजेच मंदाकिनी गंधे यांना.  

https://youtu.be/6ehjiyDv6FY

८. आठव्या  भागात आपण भेटणार आहोत भोपाळ येथील चिरपरिचित साहित्यिक व्यक्तित्व  रविंद्र भालेराव यांना. 

https://youtu.be/1Bo_iWsUlHk 

९. नवव्या  भागात आपण भेटणार आहोत, इंदूर येथील  साहित्यिका रंजना मराठे यांना. रंजनाताई यांचे अनुभव , त्यांचा जीवन प्रवास ऐकल्यावर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. 

 https://youtu.be/I5TnrFe2hL4

१०. दहाव्या भागात आपण भेटणार आहोत मध्यप्रदेशातील खंडवा येथील रचनाकार  सुधीर देशपांडे यांना.  सुधीर देशपांडे हे कविता, नाटक व व्यंग्य रचना यांचे  लेखन करतात. 

https://youtu.be/gWKVTgJXLk0 

११. अकराव्या भागात आपण भेटणार आहोत मूळच्या मध्यप्रदेशातील इंदूर येथील व आता पुण्यात स्थायिक झालेल्या रचनाकार अर्चना शेवडे यांना. 

https://youtu.be/rITgaH0IFYo

१२. बाराव्या भागात आपण भेटणार आहोत भोपाळ येथील साहित्यिका किरण खोडके यांना. त्यांना बाल साहित्यासाठी सन्मान आणि पारितोषिक मिळाली आहेत. 

 https://youtu.be/1FCMOw4wkS0 

१३. तेराव्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या सर्वांच्या आवडत्या व उत्कृष्ट साहित्यिका जया गाडगे यांना.  

 https://youtu.be/ATWYjXTt3-o 

१४. चौदाव्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील साहित्यिका भारती पंडित यांना.

 https://youtu.be/jTswIPg3g2g

१५. आजच्या या पंधराव्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील वरिष्ठ व ज्यांच्या रचनांचा आनंद आपण सर्व नेहमीच आनंदाने घेतो त्या साहित्यिका प्रतिभा धडफळे यांना.

 https://youtu.be/EWOIN5sns7g

१६. सोळाव्या भागात आपण भेटणार आहोत मंडी, हिमाचल प्रदेश येथील साहित्यिक विनायक भावसार यांना

 https://youtu.be/VKHgv3hYrjM 

१७. सतराव्या भागात आपण भेटणार आहोत पणजी गोवा येथील सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री शांता लागू यांना 

 https://youtu.be/pOtbQR3fAsI 

१८. अठराव्या भागात आपण भेटणार आहोत देवास येथील सुप्रसिद्ध व वरिष्ठ रचनाकार  राधिका इंगळे यांना 

https://youtu.be/yv6l_qna03k

१९. एकोणिसाव्या भागात आपण भेटणार आपल्या समूहातील साहित्यिक प्रशांत कोठारी यांना

 https://youtu.be/D9aeKPe7hVM

२०. विसाव्या  भागात आपण भेटणार आहोत  ज्येष्ठ रचनाकार सुषमा अवधूत यांना. सुषमाजी ह्या रचनाकार तर आहेतच त्याशिवाय,  नाटकात अभिनयही करतात.

 https://youtu.be/Aty27J3IXzY

२१. एकविसाव्या  भागात आपण भेटणार आहोत  साहित्यिक व गायक दीपक देशपांडे यांना, ज्यांना नुकतेच बेस्ट ऑफ किशोर ट्रॉफीने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 

 https://youtu.be/g_zz0UiI8Jw 

२२. बाविसाव्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एका रसिक वाचक समूहाला व समाजात कोणत्या ना कोणत्या बाबतीत आपला विशिष्ट ठसा उमटविलेल्या चार व्यक्तिमत्त्वांना. ते आहेत अनिल राजूरकर,  वैभव पुरोहित, जयंत तेलंग व  हेमंत पोतदार यांना.

२३. तेविसाव्या  भागात आपण भेटणार आहोत भोपाळ येथे वास्तव्य असणाऱ्या साहित्यकार शोभा भिसे यांना.   तर या मुलाखतीत त्यांचे विचार , भावना आणि त्यांची सुंदर साहित्य निर्मिती व साहित्यातली विविध दालने... जसे की हायकू, कहमुकरी इत्यादी .

२४.  चोविसाव्या  भागातील ही मुलाखत या उपक्रमाला एक वेगळाच दर्जा देणारी ठरणार आहे  आणि म्हणूनच या मुलाखतीची लांबी जरी वाढली असली तरी ही मुलाखत ज्या मजकुराने, आठवणीने, ज्ञानाने सजली आहे ,ते पाहिल्यावर वाढलेला वेळ हा योग्यच आहे हे पटेल कारण की ही मुलाखत आहे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व,  उत्कृष्ट व ज्येष्ठ साहित्यकार, काव्य समीक्षक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाच्या निर्मितीतील एक प्रमुख घटक म्हणून आपण ज्यांना ओळखतो तसेच भोपाळ येथे दिनांक नऊ व दहा फेब्रुवारी २०१३ रोजी झालेल्या प्रांतिक साहित्य संमेलनाचे  अध्यक्ष असे आदरणीय चंद्रकांत पांढरीपांडे यांची. 

 https://youtu.be/OiWesUmTwhA 

२५.  पंचविसाव्या  भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील साहित्यकार अर्चना वैद्य  करंदीकर यांना . मुलाखत  आभा निवसरकरने घेतली आहे तर या मुलाखतीत आपण पाहूया आणि ऐकूया त्यांचे विचार  त्यांच्याच तोंडून. 

https://youtu.be/l4KMaxhpGG0 

२६. सहविसाव्या  भागात आपण भेटणार आहोत  साहित्यकार श्रीनिवास कुटुंबळे  यांना . 

 https://youtu.be/wYKqh273MVw

२७. सत्ताविसाव्या  भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एक उत्साही व्यक्तिमत्व जिने अत्यल्प अवधीतच प्रगतीची अनेक शिखरे गाठलेली आहेत, जी शॉपिझन ॲप, श्री सर्वोत्तम पत्रिका इ. मध्ये चांगल्या पदावर सुस्थापित आहे व जिचा आपल्या सर्वांना खूप अभिमान आहे अशी साहित्यकार ऋचा कर्पे  हिला.  

https://youtu.be/75J3_yyzlqU

२८. अठ्ठाविसाव्या  भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एक उत्साही व साहित्य निर्मितीचे नवनवीन प्रयोग करून पाहणारी हसतमुख व्यक्तिरेखा व साहित्यकार ऐश्वर्या  डगांवकर यांना  

 https://youtu.be/PdSjBEGnbdo 

२९. एकोणतिसाव्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एक उत्साही, हसतमुख व्यक्तिरेखा व तरुण  साहित्यिक चिन्मय पराडकरला. 

https://youtu.be/GoVbZGB07hs

३०.  तिसाव्या  भागातील ही मुलाखतीत आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील साहित्यिक श्री. रामचंद्र किल्लेदार यांना . आज मुलाखतकार आहेत आभा निवसरकर . 

https://youtu.be/MVFOqAKdGWw 

३१. एकतिसाव्या  भागातील ह्या मुलाखतीत आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील साहित्यकार वसुधा गाडगीळ यांना . मुलाखतकार आहेत आभा निवसरकर 

 https://youtu.be/ewvqf_JB-LQ 

३२. बत्तिसाव्या  भागातील ह्या मुलाखतीत आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील साहित्यकार स्वाती श्रोत्री  यांना . मुलाखतकार आहेत आभा निवसरकर 
 
 https://youtu.be/XZzABKo7bgg 

३३. तेहतिसाव्या  भागातील मुलाखतीत आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील वरिष्ठ व अत्यंत दर्जेदार साहित्यसृजन करणारे साहित्यकार श्रीधर जहागीरदार यांना 

 https://youtu.be/D7yq54an50g

३४. चौतिसाव्या  भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एक वरिष्ठ साहित्यिका वर्षा तारे यांना . या भागातील मुलाखतकार आहे  आभा निवसरकर 

 https://youtu.be/m2t_onGfxCM

३५. पस्तिसाव्या   भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एक हसतमुख व उत्साही   साहित्यिका मेघा  जोशी यांना .  

 https://youtu.be/ODNojS8ybDQ

३६. छत्तिसाव्या   भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एक साहित्यिका विशाखा मुलमुले  यांना .  मुलाखतकार आहे आभा निवसरकर .

 https://youtu.be/i9BCwZUpH0k 

३७. सदतिसाव्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एक साहित्यिका निकिता डोळे यांना . मुलाखतकार आहे आभा निवसरकर . 

 https://youtu.be/8_YtypTKZqU

३८ . अडोतीसाव्या  भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एका हसतमुख व्यक्तिमत्त्वाच्या गोड साहित्यिकेला . त्यांच नाव आहे माधुरी खर्डेनविस 

https://youtu.be/eUKr_FVGFZA 

३९. ३९व्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एक व्यक्तिमत्व शुभा / मृदुला देशपांडे यांना

https://youtu.be/EGEorZEbxVI 

४०.  ४०व्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एक ज्येष्ठ  साहित्यिका अरुणाताई खरगोणकर यांना

 https://youtu.be/lju1dw8VoNM 

४१. ४१ व्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील उत्तम व संवेदनशील लेखन करणारी कवयित्री आभा निवसरकर यांना

https://youtu.be/HzKOvYH99mE

४२. ४२व्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एक ज्येष्ठ व हरहुन्नरी साहित्यिका वासवदत्ता अग्निहोत्री यांना

https://youtu.be/oR0QOcU5O4w 

४३. ४३व्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील एक ज्येष्ठ व हरहुन्नरी साहित्यिका तसेच आपल्या लोकप्रिय मुलाखत कार सुषमा ठाकूर यांना. मुलाखतकार आहे आभा निवसरकर 

 https://youtu.be/0wEExyFl53Q

४४. ४४व्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील तीन भाषांवर प्रभुत्व असलेल्या साहित्यिका वैजयंती दाते यांना

 https://youtu.be/ArUyCvOdnmk 

४५. ४५व्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील साहित्यिका निशा देशपांडे  यांना

 https://youtu.be/KcMLm51_NQ8

४६. ४६व्या भागात आपण भेटणार आहोत आपल्या समूहातील साहित्यिका  सुषमा मोघे  यांना

 https://youtu.be/nVhCZRr9QN4 

४७. सत्तेचाळिसाव्या भागात आपण भेटणार आहोत  साहित्यिका  सुरेखा सिसोदिया यांना

 https://youtu.be/3iTLeitz5TQ 

४८. अट्ठेचाळीसाव्या भागात आपण भेटणार आहोत मराठी व हिंदी भाषांमध्ये समान ताकदीच्या कविता लिहिणाऱ्या व आम्ही रचनाकार ' व 'माय मावशी' समूहाच्या संस्थापिका  अलकनंदाताई साने यांना. 

 https://youtu.be/ficYI2D6pGo

४९. एकोणपन्नासाव्या  भागात आपण भेटणार आहोत समूहातील युवा प्रतिभा दिव्या विळेकर हिला  . 

 https://youtu.be/iTFmrywvmAk 

५०. पन्नासाव्या भागात आपण भेटणार आहोत समूहातील प्रतिभावान साहित्यिक यादवराव गावळे यांना  .

 https://youtu.be/IT3vCje16vE 

५१. इक्कानव्या भागात आपण भेटणार आहोत समूहातील प्रतिभावान  साहित्यकारा व अनेक  साहित्यिक सन्मानाच्या मानकरी  क्रांती येवतीकर - कनाटे  यांना  . 
 
https://youtu.be/U_IVMkAwrJw

५२. बावन्नाव्या भागात आपण भेटणार आहोत समूहातील वरिष्ठ सदस्य नीला करंबेळकर  यांना  . 

https://youtu.be/Qb7wlRtvqaE

५३. त्रेपन्नाव्या भागात आपण भेटणार आहोत एका तरुण,उत्साही व दर्जेदार लेखन करणारी  कवयित्री  स्वरांगी सानेला
 
https://youtu.be/zrN47n5wsjo

५४. चौपन्नाव्या भागात आपण भेटणार आहोत समूहातील कवयित्री तसेच गद्य लेखनही करणाऱ्या  वंदना पुणतांबेकर यांना. 

 https://youtu.be/c0hwVaCwHrM

५५.  पंचावन्नाव्या भागात आपण भेटणार आहोत समूहातील वरिष्ठ साहित्यिका संध्या टिकेकर यांना.   या मुलाखतीत आपण पाहूया आणि ऐकूया  यांचे विचार , भावना आणि  साहित्य निर्मिती त्यांच्याच  तोंडून.


५६ . छप्पनाव्या भागात आपण भेटणार आहोत समूहातील वरिष्ठ साहित्यिका आशा गोगटे  यांना. या मुलाखतीत आपण पाहूया आणि ऐकूया  यांचे विचार , भावना आणि  साहित्य निर्मिती त्यांच्याच  तोंडून.


५७. सत्तावन्नव्या भागात आपण भेटणार आहोत समूहातील  कवयित्री व लेखिका  भावना दामले  यांना. या मुलाखतीत आपण पाहूया आणि ऐकूया  यांचे विचार , भावना आणि  साहित्य निर्मिती त्यांच्याच  तोंडून.


५८. अठ्ठावन्नव्या भागात आपण भेटणार आहोत समूहातील  सुषमा वडाळकर यांना. या मुलाखतीत आपण पाहूया आणि ऐकूया  यांचे विचार , भावना आणि  साहित्य निर्मिती त्यांच्याच  तोंडून.



५९. एकोणसाठाव्या भागात आपण भेटणार आहोत समूहातील साहित्यिका  माया जोगळेकर यांना. या मुलाखतीत आपण पाहूया आणि ऐकूया  यांचे विचार , भावना आणि  साहित्य निर्मिती त्यांच्याच  तोंडून.


६०. साठाव्या भागात आपण भेटणार आहोत समूहातील साहित्यिका  कुंदा  जोगळेकर यांना. खणखणीत आवाज आणि भिडणाऱ्या  रचना. तुम्हाला त्यांची मुलाखत ऐकून नक्कीच मजा येईल . 
















No comments:

Post a Comment

    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...